प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) एस फोर सोल्युशन्स प्रकाशन संस्था, यांच्यावतीने "माझे हृदयस्थ श्रीगुरु" या विषयावरती लेख...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
एस फोर सोल्युशन्स प्रकाशन संस्था, यांच्यावतीने "माझे हृदयस्थ श्रीगुरु" या विषयावरती लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या लेखन स्पर्धेत एकूण दहा जणांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एकूण मानांकनांपैकी प्रथम 25 जणांना सहभाग प्रमाणपत्र दिले. त्यातील दहा जणांची अंतिम निवड करून एस एम जोशी सभागृहात अतिशय दिमागदार पद्धतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.प्रा. रतिलाल बाबेल व सौ. अक्षदा बाबेल यांनी हा पुरस्कार प्रशांत अनासपुरे यांच्या हस्ते स्वीकारला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर गौतम बेंगाळे हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्निल पोरे, ब्रह्मकुमारी शामला दीदी, मिलन मेत्रे, सुनील नाईक, एस फोर सोल्युशन्स चे मुख्य प्रवर्तक शैलेश दादा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मान पत्राचे वाचन प्रशांत अनासपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शोभा कुलकर्णी यांनी केले.
प्राध्यापक रतिलाल बाबेल हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध वक्ते आहेत. विज्ञान व गणित अध्यापक संघाच्या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. वडिलांच्या नावाने त्यांनी स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्टची स्थापना करून समाजातील 300 पेक्षा जास्त मान्यवरांचा सत्कार केला आहे. शासन व विविध संस्थांचे त्यांना आतापर्यंत दीडशे पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.
या निवडीबद्दल जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे, आदर्श शिक्षक श्री प्रशांत जोंधळे, खजिनदार श्री. व्यंकट मुंढे , माजी सचिव श्री. तानाजी वामन,श्री.प्रकाश बाबेल, श्री. अशोक बाबेल, सौ. माया कटारिया, श्री. जे. सी. कटारिया, सौ. सविता बाबेल, श्री. सुहास जाधव, आदर्श शिक्षक श्री अरविंद मोढवे सर, श्री. अंकुश घाडगे, जुन्नर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ. अनिता शिंदे, श्री. शंकर केंगले, श्री. हरिभाऊ खरजुले यांनी अभिनंदन केले.
रतिलाल बाबेल यांची ज्ञान कण व विज्ञान प्रेरणा ही दोन पुस्तके प्रकाशित झाली असून 33 मूलद्रव्यांची माहिती असणाऱ्या "कविता मूलद्रव्याची" या कवितासंग्रहाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञान प्रसारासाठी त्यांनी विविध शाळांमध्ये 1000 पेक्षा जास्त मोफत व्याख्याने दिली आहेत. गरीब आणि गरजू मुलांना सतत आर्थिक मदत करण्यात ते अग्रेसर असतात. त्यांचा सामाजिक व आध्यात्मिक पिंड असून शैक्षणिक कार्यातील त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
आध्यात्मिक लेखनाला पुरस्कार मिळणे ही सद्गुरूंची कृपा असून एस फोर सोल्युशन ने विविध परीक्षकांच्या द्वारे केलेली निवड कौतुकास्पद असल्याचे मत पुरस्कारार्थी प्रा. रतिलाल बाबेल यांनी मांडले.
COMMENTS