लोकसभेत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभेला कंबर कसली आहे. दरम्यान विधानसभेची (Maharashtra Assem...
लोकसभेत राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभेला कंबर कसली आहे. दरम्यान विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) रणनीती ठरवण्यासाठी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचे महाधिवेशन पार पडले.
यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात तसेच आता भाजपबरोबर या निवडणुकीत मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा लवकर सुटला नाही. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळच मिळाला नाही. परिणामी अनेक जागांवर पराभव पत्कारावा लागला, असं महायुतीतील प्रमुख नेत्यांचं म्हणणं आहे. आगामी विधानसभेत मात्र ही चूक आपण टाळायला हवी, यावर देखील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.
परराज्यातील अनेक नेते महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहात आहे याचा आढावा ते घेत आहेत. त्यावरून जागावाटप, उमेदवार निवडला जाणार आहे. या सर्व घडामोडीवर अमित शहा लक्ष देऊन आहेत. दरम्यान राज्यात त्यांचेही दौरे वाढलेले आहेत. दरम्यान आता पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे महायुतीत मोठ्या घडामोडी घडणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत देखील अमित शहांची बैठक होणार आहे.
दुसरीकडे २३ सप्टेंबर रोजी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत भाजपची ६० ते ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. आगामी विधानसभेत भाजप १५० ते १६० जागा लढवण्यास इच्छुक असून शिवसेना शिंदे आणि अजित पवार गटाला समसमान जागा मिळू शकतात, अशी माहिती राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे.
COMMENTS