सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील वाद आणखी उफाळून आल...
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील वाद आणखी उफाळून आला आहे. यातच राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषेदच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे आता जिल्ह्यात राजन पाटील यांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे नाराज झालेले उमेश पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. अजित पवार गटात निर्माण झालेलं हे वादळ आता कधी शमणार? याची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.
मोहोळमध्ये जन सन्मान यात्रेत अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी राजन पाटलांना न्याय दिला नसल्याचे विधान केले होते. त्यावेळी राजन पाटील लवकरच राज्याच्या राजकारणात दिसतील असे विधान करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लॉटरी लागली आहे. त्यावरून उमेश पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मी पदाचा राजीनामा लिहून ठेवला आहे. असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे. तर उमेश पाटलांनी राजीनाम्याचे बंद पाकीट दाखवले. असा टोला राजन पाटील यांनी लगावला.
राजन पाटलांनी सहकारी कारखाना खासगी करून स्वत: नावावर केला. शेतकऱ्यांच्या कारखाना हडप करणाऱ्या नेत्याला सहकार परिषदेचा अध्यक्ष करणे हास्यस्पद आहे. मात्र सरकारने त्याच राजन पाटलांना दिले. सहकारी संस्था मोडीत काढणे,, हडप करणे, असा अनुभव असलेल्या नेत्याला सहकार परीषेदेचे अध्यक्ष केले आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. असेही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, राजना पाटलांच्या मागे मोहोळ तालुका नाही, हे जन सन्मान यात्रेच्या दिवशी कळून आले. राजन पाटील हा मोहोळ तालुक्यातील लोकांना माहिती आहे की तो कसा आहे, परंतु महाराष्ट्राला कळावं म्हणून माझा विरोध आहे. पक्षातील लोकांना वाटत असेल की त्यांच्यामुळे मोहोळची राखीव जागा निवडून येते. पण त्यात त्यांचे योगदान नाही हे पक्षाला माहिती नसेल. मोहोळची जागा निवडून येत नाही हे १०० टक्के सत्य आहे. विधानसभेला ही जागा निवडून येत नाही हे मी पक्षाला सांगितले असल्याची प्रतिक्रिया उमेश पाटलांनी दिली आहे.
COMMENTS