राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते व आमदार उपस्थ...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते व आमदार उपस्थितीत होते. या बैठकीत विधानसभेच्या (Assembly Election) जागावाटपावर २४ व २५ सप्टेंबरला बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) राष्ट्रवादीकडून महायुतीमध्ये ७० पेक्षा जास्त जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नसल्याची हमीही अजित पवारांनी दिली असल्याची माहिती आहे. या बैठकीत वाद असणाऱ्या जागेवर चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत तोडगा न निघाल्यास जागांबाबत दिल्लीत अमित शाह यांच्यासमवेत महायुतीच्या नेत्याची बैठक होणार आहे.
राष्ट्रवादी ७० जागांवर राष्ट्रवादी दावा करणार असल्याचे सांगण्यात आले. आचारसंहिता काही दिवसात लागणार असल्यामुळे या बैठकीत प्रचाराबाबतही चर्चा करण्यात आली. महायुतीमध्ये एखाद्या आमदाराचा निगेटिव्ह सर्व्हे आला तर त्या जागेवर त्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीने गेल्या विधानसभेत ५४ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये आता १५ जागा जास्त मागण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
या बैठकीत स्थानिक पातळीवर महायुतीच्या नेते-कार्यकर्त्यांशी जुळवून घेण्याचा सल्लाही देण्यात आला. ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्याठिकाणी कसे काम करायला हवे याबाबतही माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे महामंडळ वाटपावरुन नाराजी असल्याचा सूरही यावेळी होता. (Assembly Election)
COMMENTS