प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे या महाविद्यालयातील प्...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे या महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ मार्गदर्शन कार्यक्रम आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.त्यावेळी प्रेरणादायी वक्ते प्रा.रतिलाल बाबेल बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उत्तम शेलार होते. यावेळी कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,डॉ.लक्ष्मण घोलप,प्रा.लोकेश डुंबरे,बीसीएस विभागप्रमुख प्रा.निलेश गावडे,बीबीए बीकॉम विभाग प्रमुख प्रा.गणेश बोरचटे,बीएससी आयटी विभागप्रमुख प्रा.प्रशांत काशीद,एमसीए एमसीएस विभागप्रमुख प्रा.योगेश राऊत,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.दिनेश जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.रतिलाल बाबेल म्हणाले की,AI मुळे नोकऱ्या जाणार नाही तर नोकऱ्यांचे विस्थापन होईल.स्वतःला अपग्रेड करीत,AI तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल. हे करीत असताना माणूस एकलकोंडा होण्याची शक्यता नाकरता येत नाही.भविष्यात अधिक मानसोपचार तज्ञांची गरज पडेल.प्रत्येकाला काहीतरी छंदाची जोड देऊन योग अभ्यास शिकावाच लागेल.AI चे फायदे अनेक असताना सुद्धा,नैतिक चिंतेबरोबर गोपनीयता समस्या सुद्धा वाढणार आहे.AI हे साधन आहे.AI शक्तिशाली सहयोगी आहे,प्रतिस्पर्धी नाही.मानवी सर्जनशीलतेपुढे सगळे काही फिके आहे.
न्यूनगंडाला आत्मविश्वासात रूपांतरित करता येते हे सुरज चव्हाण या कलाकाराकडून शिकता येते.विद्यार्थ्यांनी कुतुहल जागृत ठेवा.का? कसे? केव्हा? कुठे? किती? यासारखे प्रश्न मनाला विचारा.प्रश्न विचारणाऱ्या अर्जुनाला आपला मित्र बनवा.लोग क्या कहेंगे (LKK ) या रोगाचा जास्त विचार करू नका.गरजा व हाव यातील फरक ओळखा.सैनिकांच्या प्रती कृतज्ञ रहा.त्यांच्या त्यागाचा,शौर्याचा,निष्ठेचा सन्मान राखा.यशस्वी होण्यासाठी मोठे स्वप्न पहा.स्वप्नांची यादी करा.सकाळी उठल्याबरोबर त्याची उजळणी करा.गरिबी,लाचारी,नकारात्मकता यशाच्या आड येत नाही.जिद्द,चिकाटी,मेहनत यश प्राप्त करून देते.विपरीत परिस्थितीत सुद्धा यश मिळवता येते हा आत्मविश्वास मनात जागू द्या.व्यसन करायला नाही तर निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते.अपयश,निंदा पचवायला शिका.आई वडिलांचा फोन कट करीत जाऊ नका.अनेकांना तो फोन कधीच येत नाही.दुर्लक्ष करायला शिका,लगेच प्रतिक्रिया देऊ नका.तंत्रज्ञानाच्या युगात आनंदाने जगायचे असेल तर एखादा तरी आवडीचा छंद जोपासा.नैतिकतेची पातळी तपासा.संवाद हरवू देऊ नका. पाणी,माती आणि नाती जपा.कपडे व शरीराची स्वच्छता करतो तसे मनाची स्वच्छता करा.सतत प्रयत्नशील रहा,मध्येच थांबू नका.अपयशातून बोध घ्या.आपले शरीर आपला जीवनसाथी आहे.शरीराला फिट ठेवा.त्यासाठी प्राणायाम,मेडिटेशन करा.दररोज ३५ मिनिटे वेगाने चाला असा सल्ला प्रा.बाबेल यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त शेळके यांच्या हस्ते नुकत्याच सेट पास झालेल्या प्राध्यापकांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.उत्तम शेलार यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.गौरी भोर यांनी तर आभार प्रा.गणेश बोरचटे यांनी मानले.
COMMENTS