प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये पाडळी बीट मधील शिक्षकांची शिक्षण परीषद गटविकास अधिक...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये पाडळी बीट मधील शिक्षकांची शिक्षण परीषद गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी ,गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.या परिषदेमध्ये " विद्यार्थी सुरक्षितता " या विषयावर जुन्नर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अवचर साहेब बोलत होते.
शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घ्यावी.शालेय परिसरामध्ये CCTV कॅमेरे लावावेत.शाळेमध्ये तक्रार पेटी ठेवण्यात यावी व नियमितपणे तक्रार पेटीतील सूचना पहाव्यात.तसेच कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करावी असे आवाहन करण्यात आले.
शिक्षण परिषदेच्या निमित्ताने खामगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दुंदा भालिंगे, खडकुंबे केंद्राचे केंद्रप्रमुख वामन शेळके यांनी मार्गदर्शन केले.तसेच सुनिल पाटील ,सुरेखा दुराफे ,सुनिल हाडवळे ,रविंद्र पानसरे,अमोल देवचे ,तुकाराम हगवणे या शिक्षकांनी विवीध विषयावर मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन शिक्षक पतसंस्थेचे संचालक सचिन मुळे यांनी केले .यावेळी पाडळी बीट मधील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
COMMENTS