प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आज शनीवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी श्री लेण्याद्री विद्या मंदिर बल्लाळवाडी, ता. जुन्नर येथील किशोरवयी...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज शनीवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी श्री लेण्याद्री विद्या मंदिर बल्लाळवाडी, ता. जुन्नर येथील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता, स्व - संरक्षण व जनजागृती अभियानांतर्गत *"कळी उमलताना"* हा कार्यक्रम घेण्यात आला.
मुलींनो तुम्ही जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकी आहात,संकटांना सक्षमपणे सामोरे जा. असे प्रतिपादन डॉ. पुष्पलता शिंदे यांनी यावेळी मुलींना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी, पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड चा वापर कसा करावा व त्याची विल्हेवाट कशी लावावी, या काळात आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा याबाबतही त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर समाजात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होतात त्याबाबत मुलींनी कशाप्रकारे या गोष्टींचा प्रतिकार केला पाहिजे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच जितेंद्र बिडवई यांनी मुलींना मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करत असताना,समोरची व्यक्ती आपल्याला कोणत्या हेतूने स्पर्श करते हे लक्षात घ्या. परंतु लहान लहान मुलींना ते ज्ञान अवगत नसते. म्हणूनच कुटुंबात,शाळेत अथवा समाजात वावरत असताना सांभाळून रहा. एखादी व्यक्ती आपल्याशी कोणत्या हेतूने सलगी करते हेही लक्षात घ्या. आणि तसे काही वाटल्यास आपल्या आई वडिलांना सांगा.
मोबाईलचा योग्य वापर करा. आई-वडील आपले दैवत आहेत, त्यांच्याशी संवाद ठेवा आणि चांगली संगत करा असे आवाहन मुलींना केले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, संचालक आदिनाथ चव्हाण,बल्लाळेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा उषा सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक डॉ. पुष्पलता शिंदे,कविता भोर ,केंद्र प्रमुख स्वप्नजा मोरे,मुख्याध्यापिका अनिता डोंगरे, पोलीस पाटील सुरेश डोंगरे ,डिसेंट फाउंडेशन चे समन्वयक योगेश वाघचौरे,शिक्षक व विद्यार्थिनी उपस्तीत होते.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता डोंगरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका अनिता डोंगरे यांनी मानले.
COMMENTS