प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे (सर ) आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल शाळेत गोपाळकाला सण मोठ्या उत्साह...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे (सर )
आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल शाळेत गोपाळकाला सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील बालगोपालांनी मानवी मनोरे उभारून दहीहंडी फोडण्यात आली. मानवी मनोरे उभारत असताना एकमेकांच्या सहकार्याने यशाची शिखरे गाठता येतात असा संदेश देणारी दहीहंडी साजरी करताना सर्व विद्यार्थी मोठ्या आनंदात होते. तसेच बदलापूर घटनेचा निषेध देखील करण्यात आला तर याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन देखील शाळेच्या वतीने करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन श्री.सुभाष मोहरे यांनी तर यामध्ये सहभाग शाळेचे मुख्याध्यापक श्री.अन्वर सय्यद सौ.स्मिता ढोबळे व सौ.आरती मोहरे आणि सौ.लिलावती नांगरे यांनी केले.
COMMENTS