प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये मे...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने "इंडस्ट्रियल रोबोटिक्स" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रा.संजय कंधारे,सर्व विभागप्रमुख,शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी सॅप पार्ट्स प्रायव्हेट लिमिटेड येथील रोबोटिक्स इंजिनियर निलेश केकने हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सदरच्या कार्यशाळेत रोबोटिक्स या तंत्रज्ञानासाठी वापरण्यात येणारे प्रोग्राम्स,त्याचे मूलभूत ज्ञान मुलांना देण्यात आले.कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वस्तू उचलून दुसरीकडे ठेवणारा रोबोट,सोलर ऊर्जा ट्रॅक करणारा रोबोट,व्हॅक्युम क्लिनिंग करणारा रोबोट,स्मार्ट कार रोबोट,रोप वे रोबोट,वायफायच्या माध्यमातून बोलणारा रोबोट आणि आग शोधून भिजवणारा रोबोट अशा विविध प्रकारच्या रोबोट साठीचे प्रोग्राम आणि छोटे रोबोट विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या जोडले व ऑपरेट केले.
सदर कार्यशाळेत द्वितीय आणि तृतीय वर्ष निकटोनिक्स तसेच तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सदर कार्यशाळे दरम्यान
रोबोटिक्स इंजिनियर निलेश केकन यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक सहली च्या निमित्ताने शिक्रापूर येथील कंपनीला भेट देण्यास सांगितले.
द्वितीय आणि तृतीय वर्षाचे मेकॅट्रॉनिक्स इंजिनियरिंग चे विद्यार्थी तसेच तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बहुसंख्येने या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेसाठी मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.शाम फुलपगारे,प्रा.संदीप त्रिभुवन,प्रा.प्रकाश डावखर यांनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS