प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर एज्युकेशन सोसायटी जुन्नर, " एक पेड माँ के नाम" अभियान राबवून शुक्रवार दिनांक 23/8/24...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर एज्युकेशन सोसायटी जुन्नर, " एक पेड माँ के नाम" अभियान राबवून शुक्रवार दिनांक 23/8/24 रोजी जवळजवळ 50 वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री धनेश संचेती यांनी दिली.बहावा, तामण, (राज्याचे राज्यफूल ) वड,पिंपळ, लिंब अशा अनेक उपयुक्त व निसर्ग पूरक वृक्षाची लागवड करण्यात आली. शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील प्रत्येक वर्गाला एक झाड दत्तक देऊन त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली आपण आपल्या आईची जशी काळजी घेतो तशीच झाडांची देखील काळजी घ्यावी हाच उद्देश ठरवून या उपक्रमाला " एक पेड माँ के नाम" असे शीर्षक देण्यात आले. या झाडाच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा जाळ्या देखील बसवण्यात आल्या.ह्या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री धनेश संचेती ह्यांनी ग्लोबल वॉर्निंग व वाढते तापमान ह्या संदर्भात माहिती दिली.तसेच आपण आपल्या आईवर जसे प्रेम करतो तसे आपण झाडांवर प्रेम करावे तसेच आपण आपल्या आईला जेवढे जपतो तेवढे वृक्षांना देखील जपावे जेणेकरून हे वृक्ष आपल्यावर आईप्रमाणे माया करतील असे आवाहन सर्व संचालकानी केले. या कार्यक्रमासाठी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुधीर ढोबळे,उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष धनेशशेठ संचेती, सेक्रेटरी अविनाश थोरवे, संचालक श्री नितीन मेहता, श्री राहुल जोशी, श्री संजय मुथा, श्री सुहास भगत, श्री सुनील गुरव, डॉक्टर नीलिमा जुन्नरकर, श्री जितेंद्र हांडे( देशमुख) श्री आनंद सासवडे,शं, बु.पा. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.साबळे सर, उपमुख्याध्यापक श्री उकिरडे सर, पर्यवेक्षक श्री खराडे सर,प्राचार्य सबनीस च्या मुख्यध्यापिका सौ थोरवे मॅडम, इंग्लिश मेडीयम च्या मुख्यध्यापिका सौ काजळे मॅडम, सौ हिंदुजा मॅडम, जुनिअर कॉलेज चे विभागप्रमुख श्री आहेर सर, गाजरे बालकमंदिर च्या विभागप्रमुख सौ ससाणे मॅडम, बी. एस. सि आय टी. चे विभाग प्रमुख श्री राजपूत सर,हरित सेना प्रमुख सौ थोरवे मॅडम, प्रफुल्ल बोऱ्हाडे सर, गायकवाड सर,श्री काळे व्ही. के, श्री काशीद सर, श्री बहीर सर उपस्थित होते.
COMMENTS