पुणे शहरात खळबळ उडवून येणारी घटना समोर आली आहे. अवयव नसलेले एका महिलेचे धड खराडी येथील नदीपात्रामध्ये आढळून आला आहे. या धडापासून शीर, हातप...
पुणे शहरात खळबळ उडवून येणारी घटना समोर आली आहे. अवयव नसलेले एका महिलेचे धड खराडी येथील नदीपात्रामध्ये आढळून आला आहे. या धडापासून शीर, हातपाय वेगळे करण्यात आलेले आहेत. याठिकाणी केवळ धड आढळून आले असून अन्य अवयव मात्र गायब आहेत.
याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या प्रकरणांचा धांडोळा घेतला जात आहे.
खराडी परिसरात वॉटर फ्रंट सोसायटीजवळ असलेल्या जेनी लाइट कन्स्ट्रक्शनच्या नवनिर्माणाधीन इमारतीचे काम सुरू आहे. मुठा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह वाहून आला होता. ही दृश्य या साईटवर काम करणाऱ्या बांधकाम मजुरांनी पाहिले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. या महिलेचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिची ओळख पटू नये म्हणून शरीरापासून शिर धडावेगळे करण्यात आले आहे. पोलिसांनी हा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या महिलेचे वय अंदाजे १८ ते ३० वर्ष असल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून खून करणाऱ्या आरोपीचा शोध देखील सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार साधारण दोन ते तीन दिवस आधीच हा खून झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
COMMENTS