लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे या योजनेसाठी अर्ज भरायचे राहिले आहेत किंवा ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील त्यांच्यासाठी मुदत...
लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे या योजनेसाठी अर्ज भरायचे राहिले आहेत किंवा ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील त्यांच्यासाठी मुदत वाढविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
अर्ज भरण्यास मुदतवाढ-
अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज भरता येणार आहेत. ज्या महिलांचे अर्ज भरणे बाकी होते तसेच त्रुटी होत्या त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. यापूर्वी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. येत्या १७ तारखेपर्यंत योजनेचे दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते असे एकूण ३,००० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील, असे जाहीर करण्यात आले होते; मात्र त्याआधीच जवळपास ३३ लाख महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे १८ तारखेपर्यंत उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यातदेखील रक्कम जमा होणार आहे.
COMMENTS