प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर : जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (ता. ९) ऑगस...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर : जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (ता. ९) ऑगस्ट रोजी आदिवासींची समृद्ध कला, संस्कृती, चालीरीती आणि रुढींचे दर्शन घडविणारी रॅली काढली होती.
या वर्षीचा आदिवासी दिन समाजातील सर्व नेते, संस्था व संघटनांनी एकत्रित साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे या फेरीत सर्वांनी सहभाग घेतला. आदिवासी बहुल गावामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्याने तालुक्याच्या विविध गावाचे कार्यकर्ते तसेच कर्मचारी या फेरीत सहभागी झाले होते. यामुळे मिरवणुकीची भव्यता वाढली होती.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात फेरीला सुरुवात झाली. ट्रॅक्टर ट्रॉलीवर राघोजी भांगरे यांचा पुतळा तसेच आदिवासी वेशभूषा केलेले युवक होते. सुनीताताई बोराडे शंकर घोडे मोहन मुंडे डॉक्टर विनोद केदारी काळू शेठ गागरे गोविंद साबळे दत्ताभाऊ गवारी डॉक्टर रामदास डामसे यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव लांडे बिरसा मुंडे यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते तेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
आदिवासी दिनानिमित्त काढलेल्या फेरीत गोफ लेझीम खेळताना समाज बांधव.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे, सत्यशील शेरकर, आशा बुचके, माऊली खंडागळे, तुषार थोरात, अंकुश आमले, मोहित ढमाले यांनी राघोजी भांगरे यांना अभिवादन करून आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजाचे नेते दादाभाऊ
बगाड, देवराम लांडे, काळू गागरे, मारुती वायाळ, दत्ता गवारी, काळू शेळकंदे, तुळशीराम भोईर, अशोक लांडे साहेब देवराम मुंढे पोपट रावते, ललित जोशी तानाजी दिवटे विठ्ठल जोशी नामदेव मुंढे,साहेबराव मांढवे, प्राध्यापक संजय साबळे गोविंद सावळे, संजय मेमाणे, संजय भांगे, शुभम भवारी, संजय साबळे, मोहन लांडे, सुभाष मोहरे, किरण म्हसकर, सुरेखा मुंढे, सुनीता बोऱ्हाडे विनोद केदारी,दगडू वाघ गोविंद साबळे, अंकुश साबळे मोहन नाडेकर विश्वास भालिंगे सुनील विरणक, चैताली केंगले तसेच सरपंच,सीमाताई रगतवान पूनम भालेकर सरपंच सोमतवाडी उपसरपंच विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब लांघी व अंकुश कोकणे यांनी केले आभार प्राध्यापक संजय मेमाणे यांनी मानले.
COMMENTS