सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला. पण राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणत्याही ...
सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला. पण राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणत्याही पक्षातील आमदारांना अपात्र ठरवलं नाही. त्यानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेेेसोंबत गेलेल्या39 आमदारांना अपात्र केलं नाही, अस म्हणत ठाकरे गटाच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली.तर अजित पवारांसोबत गेलेल्या 41 आमदारांना अपात्र करण्यात यावे यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनीही कोर्टात याचिका दाखल केली. या दोन्ही याचिकेवर एकत्रितरित्या सुनावणी होणार आहे.
मागीलवेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अजित पवार गटाला, 'तुम्हाला अपात्र का करू नये,' असं म्हणत त्यांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आज अजित पवार गट काय उत्तर देणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. गेल्यावेळी झालेल्या सुनावणी दोन्ही पक्षांच्या सुनावणी एकत्रच घेतल्या जातील असे न्यायालयाने सांगितले होते.
त्यानुसार आज आधी शिवसेना ठाकरे गटाची आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुनावणी घेतली जाईल. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलणार की तसाच ठेवणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांच्या आमदारांंकडून अपात्रेबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सुनील प्रभु यांनी ठाकरे गटाकडून आणि आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडून याचिका दाखल केली होतील.

COMMENTS