प्रतिनिधी : शरद मनसुख ( सर ) सावरगाव : सावरगाव बस्ती या दोन गावाला जोडणाऱ्या मिना नदीवरच्या पुलाच्या एका खांबाला मोठी भेग पडलेली दिसून येत...
प्रतिनिधी : शरद मनसुख ( सर )
सावरगाव : सावरगाव बस्ती या दोन गावाला जोडणाऱ्या मिना नदीवरच्या पुलाच्या एका खांबाला मोठी भेग पडलेली दिसून येत आहे .सावरगाव ही मोठी बाजारपेठ असून आजूबाजूच्या दहा बारा गावातील लोकांची तसेच जुन्नर व घोडेगावला जाण्यासाठी रहदारीचा महत्वाचा मार्ग म्हणून या रस्त्याचा सरास वापर केला जातो . सावरगाव व बस्ती या दोन प्रमुख गावांना जोडणारा मीनानदी वरील पूल सध्या धोकादायक बनला आहे . या पुलाच्या भिंतीना मोठया भेगा पडल्या असून सावरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे तसेच दररोज ये जा करणाऱ्या शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवितास या पुलामुळे धोका निर्माण झाला आहे . त्यामुळे प्रशासनाने लवकरच याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त मनोज बोऱ्हाडे यांनी केली आहे .
COMMENTS