मंचर पुणे : मंचर बसस्थानक परिसरात रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून विविध आगाराच्या बसचा सतत वाहतूक प्र...
मंचर पुणे : मंचर बसस्थानक परिसरात रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून विविध आगाराच्या बसचा सतत वाहतूक प्रवास चालू असतो, परंतु रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून यामुळे खड्यांमध्ये पाणी साचत आहे. पाणी साठल्यामुळे डासांची पैदास निर्माण होत आहे. डासांच्या या निर्मितीमुळे वेगवेगळे संसर्ग जन्य आजार होण्याची शक्यता उद्भवू शकते. याचा परिणाम तेथे राहणाऱ्या परिसरातील नागरिकांवर तसेच प्रवाशांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. साहजिकच त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावू शकतो. बस स्थानकातील हे खड्डे नेमके बस थांबण्याच्या ठिकाणी असल्याने व त्यात पाण्याचे डबके साठून वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज न आल्यास अपघातदेखील होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच बस चालकांना बस वळवताना मोठी कसरत करावी लागते, प्रवाशांना चालताना देखील या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे बसमधून उतरताना त्रास होत असतो. मात्र ही परिस्थिती मागील कित्येक दिवसांपासून जैसे थे असल्याने प्रशासन या गोष्टींवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. पावसामुळे सध्याची अवस्था फारच दयनीय असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वास्तविक प्रशासन निद्रिस्त अवस्थेत आहे काय ? हा प्रश्न यामुळे नागरिक व प्रवाशांना पडत आहे. यावर वेळीच तोडगा काढण्याची उपाययोजना करावी अशी प्रवासी व नागरिकांकडून मागणी होत आहे.
COMMENTS