प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर ) नगदवाडी तालुका-जुन्नर, जिल्हा-पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सो...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
नगदवाडी तालुका-जुन्नर, जिल्हा-पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी दिली. या दिंडी सोहळ्यानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. दिंडी सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी आकर्षक वारकरी वेशभूषा परिधान करून, गळ्यात टाळ घालून, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखीसह संपूर्ण गावातून ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत व खांद्यावर भगवी पताका घेऊन गावातून फेरी मारली.या दिंडी सोहळ्यात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे व सदस्या संगीताताई बढे यांच्या वतीने सर्वच विद्यार्थ्यांना लाडू व खाऊचे वाटप करण्यात आले. दिंडी संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.या दिंडी सोहळ्याचे नियोजन मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,सुप्रिया अभंग,आशा आरेकर व उज्वला पोटे यांनी केले.दिंडी सोहळ्याचा आनंद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.
COMMENTS