प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आज शनिवार दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी डिसेंट फाउंडेशन पुणे व ग्रामपंचायत निरगुडे यांच्या संयुक्त विद्यमान...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज शनिवार दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी डिसेंट फाउंडेशन पुणे व ग्रामपंचायत निरगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने निरगुडे ता. जुन्नर, जि. पुणे येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हृदयरोग, मूत्ररोग, ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती, बीपी, शुगर व रक्तातील सर्व तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये एकूण ३१७ जणांनी सहभाग घेतला. त्यापैकी ज्यांचा मोतीबिंदू पिकलेला आहे त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पूर्णपणे मोफत केली जाणार आहे . तसेच हृदयरोग मूत्ररोगाच्या संशयित रुग्णांचे ऑपरेशन श्री हॉस्पिटल, आळेफाटा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत केले जाणार आहेत. यावेळी ४० जणांची रक्त तपासणी करण्यात आली. व ३२ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली. यावेळी तीस गरजू जेष्ठ नागरिकांना आधार काठ्यांचे देखील वाटप करण्यात आले. श्री हॉस्पिटलचे जनरल सर्जन डॉ. अमेय डोके व कथे डायग्नोस्टिक सेंटरचे प्रमुख डॉ. पंजाब कथे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई ,शंकरा आय हॉस्पिटल चे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डिसेंट फाऊंडेशनचे सचिव डॉक्टर फकीरआतार, संचालक आदिनाथ चव्हाण, ग्रामसेवक विजय येवले, प्रकाश ताजने, श्री हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक संतोष शिंदे, डॉ. विकास डूबे, डॉ. कैलास लासुर्वें व सर्व टीम, प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळेचे डॉ. श्रावण राऊत व सर्व टीम, प्रयोगशाळा तज्ञ मंगेश साळवे, समुपदेशक संदेश थोरात, दत्ता रोकडे, तपासणी तज्ञ सपना बेलवटे, पल्लवी थेटे, अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश रोकडे यांनी केले प्रास्ताविक डॉ. फकीर आतार यांनी केले तर आभार उपसरपंच दिलीप शिंदे यांनी मानले.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच सीमा शिंदे, सुरेश रोकडे, शोभा शिंदे, सुभाष ताजने, उद्धव शिंदे, बाळासाहेब रोकडे, नितीन ताजने, चंद्रकांत जेजुरकर व नवनाथ जेजुरकर यांनी प्रयत्न केले.
COMMENTS