जुन्नर : तालुका विधी सेवा प्राधिकरण व जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन जुन्नर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबीराचे आज मं...
जुन्नर : तालुका विधी सेवा प्राधिकरण व जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन जुन्नर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबीराचे आज मंगळवार दिनांक २३ जुलै २०२४ रोजी दुपारी २. १० ते २. ४५ पर्यंत दिवाणी न्यायालय क. स्तर जुन्नर येथे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नम्रता म. बिरादार तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर जुन्नर या होत्या, या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मा. नम्रता म.बिरादार मॅडम म्हणाल्या की, "सगळं मलाच पाहिजे ही वृत्ती सोडली तर तडजोडीने वाद मिटले जावू शकतात." असे सांगून उपस्थित असलेल्या सर्वांनी २७ जुलै २०२४ रोजी जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्याविषयी आवाहन केले.
यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय लोकन्यायालय व अंतरराष्ट्रीय न्यायदिन याविषयी ऍड. आर. आर. भगत व ऍड. सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कोर्टातील सर्व पक्षकार व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी मा. अनंत हिं. बाजड सह न्यायाधीश क. स्तर जुन्नर तसेच मा. स्वप्ना तु. घुले सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जुन्नर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मा. ऍड. हेमंत किसन भास्कर अध्यक्ष जुन्नर वकील संघ, ता जुन्नर जि. पुणे यांनी मांडली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. समकित नानावटी, ग्रंथपाल, जुन्नर वकील संघ, ता. जुन्नर जि. पुणे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार ऍड.आशिष वानखेडे, सेक्रेटरी, जुन्नर वकील संघ, ता. जुन्नर जि. पुणे यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.
COMMENTS