युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या ...
युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यकर्ते पत्रकार माननीय कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष तथा खारेपाट पाणी प्रश्नांचे आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते श्री.हेमंत पाटील साहेब उपस्थित होते. रायगड जिल्हा डी वाय फाउंडेशनचे अध्यक्ष यश घरत साहेब, अलिबाग तालुका प्रमुख धीरज मालवी साहेब तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे सदस्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे सदस्य श्रीकांत जाधव साहेब, आशिष कोचरगावकर साहेब, सुचित्रा समेळ मॅडम, आमचे मार्गदर्शक श्री.चंद्रकांत अंबाजी घरत साहेब, सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड, सौ.कविता गावंड, महिला अध्यक्षा सौ.मयुरी कैलास घरत, सौ.कीर्ती देसले मॅडम, ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा विद्यमान सदस्या सौ.अनिता संतोष वाघे, संगीता वाघे, विजय गोपीनाथ ठाकूर, रमाकांत देसले, बळीराम घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सर्वेसर्वा माननीय कैलासराजे घरत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. माननीय हेमंत पाटील साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी आमचे मित्र मंगेश कांबळे सर यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल खारपाडा या शाळेतील इयत्ता पाचवी मधील पेण तालुक्यातील ग्रामीण विभागामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला आलेल्या कु.प्रियांश चंद्रकांत घरत याचा चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला.
एम.एस.टी स्कूल कासारभट मध्ये 91% गुण मिळवीत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पायल रमाकांत देसले हीचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी ताई घरत ट्रस्ट चे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला. भानूबेन प्रवीण शहा माध्यमिक विद्यामंदिर तारामध्ये 82.60% गुण मिळवीत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु.जिज्ञासा नरेश पाटील हिचा शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष श्री हेमंत पाटील सर यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला.सोबत यश घरत, सुचित्रा समेळ मॅडम,सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन गावंड साहेब उपस्थित होते. तसेच माध्यमिक विद्यामंदिर खारपाडामध्ये 79.60% गुण मिळवीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु.ईशिका विजय पाटील हिचा युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या शुभहस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी ट्रस्टचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, नरेश शंकर पाटील, यश दिनेश पाटील, अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला पालक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या स्तुत्य अशा उपक्रमाचे खारपाडा आपटा पंचक्रोशीतील नागरिकांकडून स्वागत होत आहे. अशा प्रकारचे उपक्रम राबवून मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आणि त्यांना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळात समाज्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी, आदिवासी मुलांसाठी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी पालक सुसंवाद कार्यशाळा, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, वक्तृत्व संभाषण कार्यशाळा, शिवशंभू चरित्र व्याख्यानमाळा, विद्यार्थी चर्चासत्रे, गडकोट संवर्धन उपक्रम, करियर गाईडंस् असे अनेक नवनवीन शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार माननीय कैलासराजे घरत यांनी वृत्तप्रतिनिधींसोबत बोलताना सांगितले.
COMMENTS