कुमशेत : दप्तरविना शाळा आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत ता.जुन्नर,जि.पुणे येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून...
कुमशेत : दप्तरविना शाळा आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत ता.जुन्नर,जि.पुणे येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुंविषयी ॠण आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम निमित्ताने छोटेखानी बालसभा घेण्यात आली.
इ २री ते चौथीच्या विध्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. संवाद सादर केले.अवगत असलेल्या पौराणिक गोष्टी सादर केल्या ,पहिल्याच्या विद्यार्थ्यांनी श्लोक गायन केले.या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सर्वांनी सामुदायिक भजन ,प्रार्थना सादर केल्या.
श्याम लोलोपोड सरांनी गुरू शिष्य परंपरा, पुर्वीची व आत्ताची शिक्षण पध्दती, महत्त्व, माहिती सांगुन गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अंगणवाडी ताई संजीवनी नाईकवाडी यांनी आई वडिल हे पहिले गुरू असतात माहिती सांगितली.माजी अंगणवाडीताई सुलोचना डोकेबाईंनी गुरू शिष्यांविषयी पौराणिक गोष्ट सांगितली.मुख्याध्याक घोडे सरांनी गुरूंविषयीचे अनुभव आठवणी सांगितल्या गुरुजनांचे ॠण विषयी स्वरचित कविता सादरीकरण केली.
या बालसभेच्या अध्यक्ष स्थानी श्रुती संदीप डोके इ 3री ही होती.आईवडिलांच्या नंतर शिक्षक हेच आपले गुरू असतात आपल्या भाषणामधून आदर व्यक्त केला.
पुर्वा अनिल डोके इ ४थी हिने सुत्रसंचलन केले.सानवी डोके इ. ४थी हिने अनुमोदन केले.प्रज्वल नाईकवाडी याने सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गुरू विषयी आदरभाव कृतज्ञता निर्माण झाली.शिक्षणाविषयी जनजागृती तळमळ निर्माण झाली.या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ ,पालक, अंगणवाडीचे व कुमशेत शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते .
COMMENTS