जुन्नर : जुन्नर तालुक्यातील मुख्य दळणवळणाचे ठिकाण म्हणून जुन्नर बस स्थानक ओळखले जाते, मात्र या बस स्थानकातील प्रवाशांकरिता बांधलेली शौचालय...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील मुख्य दळणवळणाचे ठिकाण म्हणून जुन्नर बस स्थानक ओळखले जाते, मात्र या बस स्थानकातील प्रवाशांकरिता बांधलेली शौचालये मागील कितीतरी दिवसांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात असून या शौचालयात घाण पाणी तसेच राडारोडा पसरलेला असून दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे.
मात्र या गोष्टीकडे बस स्थानक अधिकारी कानाडोळा करत आहेत, शौचालयाच्या समोरच मोठे पाईप असून याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून कचरा, प्लास्टिक पिशव्या व घाण पाणी या ठिकाणी साचले आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दुर्गंधीमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, यामुळे वास्तविक डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊन रोगराई पसरेल असे प्रवासी व परिसरातील नागरिक म्हणत आहेत, जुन्नर बस स्थानकात महाराष्ट्रातून असंख्य पर्यटक पर्यटनाच्या द्दष्टिकोणातून येत जात असतात मात्र बस स्थानकातील अशा अवस्थेमुळे पर्यटकदेखील शौचालयाकडे जाताना नाकातोंडावर रूमाल धरूनच जात आहेत, या शौचालयातील अस्वच्छता व घाणीच्या साम्राज्यावर वेळीच तोडगा काढून लवकरात लवकर दररोजची स्वच्छता व्हावी असेच प्रवासी तसेच महिला व शालेय विद्यार्थी मागणी करत आहेत.
COMMENTS