सकाळपासूनचं जगभरामधील संगणक आणि लॅपटॉपवरती ब्लू स्क्रीन ऑफ डेथची (बीएसओडी) समस्या मोठया प्रमाणात जाणवत होती. त्यानंतर जगभरामध्ये एकच खळबळ ...
सकाळपासूनचं जगभरामधील संगणक आणि लॅपटॉपवरती ब्लू स्क्रीन ऑफ डेथची (बीएसओडी) समस्या मोठया प्रमाणात जाणवत होती.
त्यानंतर जगभरामध्ये एकच खळबळ उडाली होती. खरं म्हणजे संगणक लॅपटॉप अचानक बंद होत असल्याने, सर्व काही ठप्प झाले होते. विमान, रेल्वे, बँकिंगसह अन्य सर्व काही ठप्प झाले. दुपारपर्यंत याबाबत मायक्रोसॉफ्ट विंडोज जगभरात डाऊन झाल्याचे अनेकांनी 'एक्स'हॅण्डलवर स्क्रिनशॉर्ट्स शेअर केले. तर काहींनी सायबर अटॅकची शंका ऊपस्थित केली होती. मात्र, आता याबाबत सायबर सिक्युरिटी कंपनी 'क्राउड स्ट्राइक'ने स्पष्टीकरण जारी केले आहे.
अनेकांकडून सायबर हल्ल्याबाबत शंका?
'क्राउड स्ट्राइक' ही एक सायबर सुरक्षा कंपनी आहे, जी मायक्रोसॉफ्ट आणि इतर अनेक प्लॅटफॉर्म असलेल्या कंपन्यांचे सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठीचे काम करते. कंपनीकडून एक मोठे अपडेट जारी करण्यात आले आहे. या अपडेटमध्ये कॉन्फिगरेशन चुकीचे झाले. या चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे संगणक आणि लॅपटॉप वापरकर्त्यांना ही समस्या जाणवत होती. मात्र, काही लोकांनी या समस्येला सायबर हल्ल्याशी जोडले आहे.
क्राउड स्ट्राइकचे रशिया कनेक्शन?
क्राउड स्ट्राइक ही कंपनी २०१२ मध्ये सुरू झाली होती. जॉर्ज कुर्ट्झ, दिमित्री अल्पेरोविच आणि ग्रेग मार्स्टन यांनी या कंपनीची सुरुवात केली होती. दिमित्री अल्पेरोविच हे त्याचे सह-संस्थापक तसेच माजी सीटीओ आहेत. 1994 मध्ये त्यांचे कुटुंब रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झाले. 1980 मध्ये जन्मलेला दिमित्री अल्पेरोविच फेब्रुवारी 2020 मध्ये या कंपनीपासून वेगळा झाला. रशिया-युक्रेन युद्धाबाबतही त्यांनी काही भाकिते केली. रशियाने त्याला आपल्या देशात येण्यास बंदी घातली आहे.
तज्ञ लोकांनी सांगितलं 'हा' सायबर हल्ला नाही!
दरम्यान, क्राउड स्ट्राइकचे सीईओ जॉर्ज कुर्ट्झ यांनी माइक्रोसॉफ्ट सर्वर डाउनच्या समस्येबाबत अधिकृतरित्या 'एक्स' या समाजमाध्यमावर पोस्ट करत माहिती दिली आहे की, "क्राउड स्ट्राइक कंपनी आपल्या ग्राहकांची समस्या सोडवण्याचे काम करत आहेत. ही समस्या विंडो होस्टसाठी जारी केलेल्या अपडेटमुळे आली आहे. याचा Mac आणि Linux वर परिणाम झालेला नाही. हा कोणताही सायबर हल्ला नव्हता."
COMMENTS