प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर ) जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲॅड संजय शिवाजीराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲॅड संजय शिवाजीराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिव छत्रपती महाविद्यायीन विदयार्थी ग्राहक संस्था मर्या जुन्नर यांच्या वतीने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री निवृत्तीशेठ काळे,खजिनदार मा.सौ.कांताताई मस्करे,पालक प्रतिनिधी मा.श्री.अशोकराव काळे, व विश्वस्त अनिलकाका जोगळेकर ॲड.अविनाश थोरवे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी कुलकर्णी,प्राचार्य डॉ महादेव वाघमारे,उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा.प्रतिभा लोढा,पर्यवेक्षक प्रा.समीर श्रीमंते, तसेच जुन्नर परिसरातील जेष्ठ नागरिक, सभापती डॉ विनायक लोखंडे,सेक्रेटरी मनिषा कोरे व सर्व संचालक मंडळ,महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी' बहुसंख्य विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील गरीब, होतकरू गरजु विदयार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्याचा प्रयत्न करणारे तसेच दुर्बल, मागास,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी व त्यांच्या उज्वल भविष्याकरीता,सर्वांगीण विकासासाठी श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या माध्यमातून महत्त्वाचे कार्य ॲड संजयराव काळे साहेब करीत आहेत .
असंख्य निराधार,गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन फी सवलत तसेच वेळ प्रसंगी मोफत ही प्रवेश दिला जातो .
तसेच जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पी डी सी सी बँकेचे संचालक व जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष या तीन महत्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे संभाळत असून यावरील तिन्ही संस्थेचे नेतृत्व करीत असताना सर्व सामान्य शेतकरी व गोरगरिब नागरिक ,होतकरू विद्यार्थी यांच्या प्रगतीचा व विकासाचा विचार करणारे हे अष्टपैलु व्यक्तिमत्व आहे.
तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
COMMENTS