प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर ) शिरूर तालुक्यातील बैलगाडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरखेड येथे ३५७ बैलगाड्यांसह अनेक बक्षिसांची...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
शिरूर तालुक्यातील बैलगाडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरखेड येथे ३५७ बैलगाड्यांसह अनेक बक्षिसांची भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले.ज्यात घाटाचा राजा, फायनल चे विशेष आकर्षण होते. पुणे,नगर, पारनेर तालुक्यातील बैलगाडे रसिक आणि व्यावसायिकांच्या दुकानांनी यात्रेत रंगत आणली.
यात्रेस प्रा सुरेखाताई अनिल निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख,प्रा.अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना, निघोटवाडी सोसायटी चेअरमन संभाजीशेठ निघोट,शाहिर रामदास गुंड, शिवसेना विभागप्रमुख माउली पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रोडे, उपविभाग प्रमुख विकास गायकवाड,प्रसिद्ध बैलगाडा मालक अंकुश बनकर, राहुल हांडे,गेणभाऊ आल्हाट संदिप टाव्हरे उपस्थित होते.
निरगुडसर येथील राहुल हांडे यांचा बैलगाडा विशेष आकर्षण ठरला. यात्रा कमिटी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोमे, प्रसिद्ध क्रिकेट निवेदक राहुल बोंडे, नवनाथ पोखरकर, विकास वरे,अरूण ढोमे, भाऊसाहेब बोंडे, संजय बोंबे यांनी यात्रेची ऊत्तम व्यवस्था पाहिली.
बैलगाडा शर्यतीसाठी लक्ष्मण बांगर, बाळासाहेब टेमगीरे, स्वप्निल टेमगीरे,प्रदिप भोर, नवनाथ वाळुंज, अर्जुन विधाटे, दौलत पर्हाड ,तेजस बांगर, सुनिल डुकरे यांनी आपल्या पहाडी आवाजात शर्यतीचे समालोचन करुन बैलगाडा रसिकांची मने जिंकली.
COMMENTS