प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० एक दिवसीय कार्यशाळा जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ, ...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० एक दिवसीय कार्यशाळा
जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ, जुन्नर संचलित श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेतंर्गत एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० स्कूल कनेक्ट 'या विषयावर आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळा ही जुन्नर शहर आणि परिसरातील बारावी पास विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करण्यात आलेली होती .
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते डॉ. रवींद्र तासिलदार यांनी सहभागी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये कौशल्याधिष्ठित व बहुविद्याशाखीय शिक्षणास असाधारण महत्व राहणार आहे , हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षणक्षेत्रात अमूलाग्र बदल घडविणार आहे तसेच उच्च शिक्षणात होणारे महत्त्वपूर्ण बदल आणि कार्यप्रणाली यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सदर कार्यक्रमासाठी १०६ विद्यार्थी आणि ५५ पालकांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. विद्यापीठाने तयार केलेली व्हिडिओ क्लिपचे सादरीकरण करण्यात आले . डॉ रवींद्र तासीलदार यांचे व्याख्यान झाल्यानंतर सहभागी विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकांचे निरसन केले गेले. त्यानंतर कार्यशाळेचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे समवेत विश्वस्त मंडळाने कार्यशाळेसाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले.सदर कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी हे होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. डी. चौधरी, कला विभागप्रमुख डॉ. ए. एस. पाटील आणि वाणिज्य विभागप्रमुख डॉ. एस. जे. जाधव उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे आयोजन डॉ. टी.एम. कांबळे यांनी केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. व्ही. एच. लोखंडे व सूत्रसंचालन प्रा जे वाय शेख व डॉ. ए. जे. दुशिंग यांनी आभार मानले .
COMMENTS