प्रा. प्रवीण ताजने { सर } समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट व समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्...
प्रा. प्रवीण ताजने { सर }
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट व समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था बेल्हे या महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग व आय टी आय विभागातील २७ विद्यार्थ्यांची नेल्सन ग्लोबल प्रॉडक्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती विवाह प्रमुख प्रा.अमोल खतोडे यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग यांच्यावतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या "कॅम्पस ड्राईव्ह २०२४" अंतर्गत नेल्सन ग्लोबल प्रॉडक्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग,ऑटोमोबाईल,डिझाईन,रोबोटिक्स अँड ऑटोमेशन,हिटिंग व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग,थर्मल इंजिनियरिंग त्याचप्रमाणे सरकारी,शासकीय व निमशासकीय,खाजगी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या अनेक विविध संधी उपलब्ध असल्याचे कंपनीचे ऑपरेशन हेड दिपक ओझा व एच आर मॅनेजर संदिप पाटिल यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी विभाग:
आदिती निकम,मनीषा भोर,अनिल लोणकर,मोहन ढोबळे,राहुल आरोटे,प्रणित पोखरकर,यश टेमगिरे,सुमित विश्वासराव,आकाश सांडभोर,शिवम लामखडे,आशिष गरड,अतुल ठुबे,तृषांत जाधव,आकाश थोरात,ओंकार आतकरी.
आय टी आय विभाग:
इलेक्ट्रिशियन-
तन्मय सोनवणे,सुजल मोरे,सिद्धेश हाडवळे,रोहन घुमारे
वेल्डर-यश आहेर
फिटर-
प्रतीक गाडेकर,सुयश शिंदे,अजित माळवे,हर्षद वाडेकर,भूषण खुटाळ,शुभम डोंगरे,अथर्व येलमाळ.
या कॅम्पस ड्राईव्हसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.अमोल खतोडे,आयटीआय विभागाचे विष्णू मापारी,प्रशांत औटी यांनी विशेष प्रयत्न केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
COMMENTS