प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आनंददायी शनिवार या दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 23 जून 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल ये...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आनंददायी शनिवार या दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 23 जून 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथे सिडबॉलची निर्मिती करत असताना खरतर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व निसर्गातील होणारी वृक्षतोड किंबहुना झाडांची संख्या फार कमी होताना आज वास्तविक पाहता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यांसारख्या विविध उपक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे परंतु याची वास्तविक पाहता या सर्व गोष्टीची जबाबदारी व अंमलबजावणी आपण सर्वांनी मिळून एकत्रीत रित्या पार पाडली पाहिजे हा संदेश देत असताना आज खरतर या मृगनक्षत्र व मान्सूनपूर्व आणि निसर्गमय होणाऱ्या बदलाचा विचार करून आज शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी चे सर्व मुले आणि यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात उपलब्ध होणाऱ्या जांभूळ, आवळा, आऊळ , चिंच, करवंदे , गावरान आंबे, हिरडा , बेहडा , फणस, पपई , यांसह विविध औषधी वनस्पतींच्या बिया यांचे मुलांना शाळेतील मैदानातील मातीपासून सिडबॉल बनवून ते दोन दिवसात शाळेशेजारी असणाऱ्या गायरान परिसरात टाकून त्याद्वारे विविध प्रकारच्या वनस्पतीची निर्मिती होईल असे ठरविण्यात आले आहे.
या उपक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक आणि पालक यांनी सहभाग घेऊन यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमात सहभागी शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद, पदवीधर शिक्षक श्री. सुभाष मोहरे शिक्षिका सौ. स्मिता ढोबळे, सौ. आरती मोहरे व सौ. लिलावती नांगरे होत्या तर अतिशय या मातीकामात सक्रिय सहभागी शाळेतील सर्व बाल चिमुकले यांचा सिंहाचा वाटा आहे.
COMMENTS