समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने आयोजित "प्लेसमेंट...
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने आयोजित "प्लेसमेंट ड्राईव्ह २०२४"अंतर्गत फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांची नाशिक येथील 'जिनोम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड' व गुजरात येथील 'अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड' या कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.
जिनोम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही देशातील नामांकित फार्मास्युटिकल कंपनी असुन जगात नुट्रास्युटिकल औषधे निर्यात करण्यात अग्रगण्य आहे.
तसेच अल्केम हे भारतातील जेनेरिक आणि स्पेशॅलिटी फार्मास्युटिकल क्षेत्रातील सर्वात मोठे नाव आहे व या गुजरात मधील कंपनीचा समावेश पहिल्या पाच क्रमांकामध्ये येतो.
प्लेसमेंट ड्राईव्ह साठी एकूण २० विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या.जिनोम प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने प्रोडक्शन विभागप्रमुख अरविंद आठवले,एच आर श्रध्दा आहेर व प्लांट हेड एम दलाई यांनी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली.
निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
अनिकेत वाळुंज,प्रसाद साळवे आणि अनंत कुचिक यांची जिनोम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीमध्ये तर प्रथमेश मोटे,माऊली पिंगट या विद्यार्थ्यांची अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड गुजरात या कंपनीमध्ये निवड करण्यात आली.
या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.बिपिन गांधी यांनी विशेष प्रयत्न केले.प्रा.नितीन महाले,प्रा.सुजित तांबे,प्रा.मंगेश होले,प्रा.अजय भागवत आदींनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS