बेल्हे येथे १ जून २०२४ रोजी संत कबीर व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी...
बेल्हे येथे १ जून २०२४ रोजी संत कबीर व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत रजि.व आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन बेल्हे यांच्या वतीने राज्यस्तरीय ग्रामीण कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, या कविसंमेलनाला जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. ख.रा. माळवे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून रघुवीर खेडकर, वसंतराव जगताप, बाळासाहेब सोनवणे, मनोज जाधव, भावना खोब्रागडे विलास अटक,राजेंद्र पिंगट (उपसरपंच) विजय गुंजाळ, गोरक्षनाथ वाघ,दिपाली मटाले, उपस्थित होते रघुवीर खेडकर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की कवी, लेखक हा कला क्षेत्राचा कणा आहे तमाशाशी निगडीत असलेल्या कवींची माहिती दिली या दोन्ही संस्थाच्या वतीने किसनराव देशमुख यांना समाजभूषण व गंगाधर साळवे यांना कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मनोज जाधव सर, भावना खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जयद्रथ आखाडे, शब्दस्वरा मंगरुळकर, बाबजी शिरतर, शितल भगत, पुजा सोनवणे कैलास औटी, सचिन औटी, नवनाथ शिरतर, अप्पा मुलमुले सावकर पिंगट, नाना घोडे, पाराजीशेठ बोरचटे,सागरशेठ लामखडे,राजेंद्र गफले यांचे विशेष सहकार्य लाभले, जवळपास 34 च्या वर कविंच्या विविध विषयावर अतिशय दर्जेदार कविता यावेळी सादर झाल्या, अध्यक्ष डॉ. खंडू माळवे यांचे छान अध्यक्षीय मनोगत झाले व सर्व कविंचा ट्रॉफी सन्मानपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतिश शिंदे, प्रतिमा काळे यांनी केले तर आम्ही भारतीय सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अल्पेशभाऊ सोनवणे यांनी उपस्थित सर्व स्नेहीजनांचे आभार मानले.
COMMENTS