प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आज सोमवार दिनांक २४ जून २०२४ रोजी स्वर्गीय रोहिदास बबन भगत माजी पंचायत समिती सदस्य यांच्या साडेपाच म...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज सोमवार दिनांक २४ जून २०२४ रोजी स्वर्गीय रोहिदास बबन भगत माजी पंचायत समिती सदस्य यांच्या साडेपाच महिने कार्यक्रमाच्या निमित्ताने डिसेंट फाउंडेशन आयोजित एक आधाराची काठी आजी-आजोबांसाठी या उपक्रमांतर्गत सामाजिक वारसा जपत या कुटुंबातील घटक व डिसेंट फाउंडेशनचे सदस्य दिलीप दिगंबर भगत यांनी पंचवीस गरजू ज्येष्ठ आजी-आजोबांना आधार काठ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप केले.
तसेच ह.भ.प. विशाल महाराज हडवळे यांची प्रवचन सेवा संपन्न झाली.
याप्रसंगी आमदार अतुलशेठ बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, मोहित ढमाले, बाजीराव ढोल, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ. फकीर आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, अरुण पारखे,सरपंच प्रकाश गिधे, पोपट महाराज खंडागळे, ओंकार महाराज, माऊली महाराज खराडे, हनुमंत धोंडकर, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS