प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर ) जुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात क्रीडा व शारीरिक शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र ...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
जुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात क्रीडा व शारीरिक शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व आय. क्यू. ए. सी. अंतर्गत २१ जून हा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन "महिला सक्षमीकरणासाठी योग" सकाळी ७ वा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले व महत्त्व पटवून सांगितले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. डी. चौधरी यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रशिक्षणात सहभाग घेतला. या योग दिनानिमित महाविद्यालयातील योगशिक्षक प्रा.व्ही. के. रसाळ व प्रा. एन. बी. आमले यांनी महाविद्यालयातील पुरुष कर्मचाऱ्यांना योग प्रशिक्षण दिले तसेच प्रा. सौ. व्हि. एच. सावंत यांनी महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना योग प्रशिक्षण दिले. क्रीडा व शारीरिक शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, व आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे समवेत विश्वस्त मंडळाने तसेच अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्हि.बी. कुलकर्णी यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. एस. खिलारे यांनी केले व आभार डॉ. ए. के. बडे यांनी मानले.
COMMENTS