माननीय कैलासराजे कमलाकर घरत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. सन्मान एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खा...
माननीय कैलासराजे कमलाकर घरत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. सन्मान एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्व, शिवशंभूभक्त, शिवशंभूचरित्र इतिहास अभ्यासक, दुर्गरक्षक, व्यसनमुक्तीदूत,पत्रकार, युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.कैलासराजे कमलाकर घरत यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल. कोंकणदीप वृत्तपत्र समूहातर्फे राज्यस्तरीय "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा माननीय सुधीरभाऊ कदम ( शिवसेना संपर्क प्रमुख दापोली विधानसभा ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रसिध्द अभिनेत्री सिनेनाट्य साक्षी नाईक, निलेश बेहेरे, दैनिक प्रहारचे संपादक डॉ.सुकृत खांडेकर साहेब, उद्योजक दिपेंद्र पारदुळे, प्रभु अग्रहारकर, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, कवी विलास देवळेकर, राष्ट्रीय पुरस्कार कवी ख.रा.माळवे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते श्री.सचिन किसन गावंड, विजय कांबळे, नितीन चंदनशिवे कार्यकारी संपादक पांडुरंग जाधव, कार्यक्रमाचे आयोजक तथा कोंकणदीपचे संपादक दिलीप शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक १६/०६/२०२४ रोजी प्रा.सुरेंद्र गावसकर सभागृह ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इमारत, शारदा सिनेमाजवळ ,दादर (पूर्व ) मुंबई. ४००४१४ येथे पार पडला.
सामाजिक कार्यकर्ते कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका अखंडपणे सुरूच आहे.
*राष्ट्रीय पुरस्कार*:-
१) महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार-२०२३
२) राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव सन्मान-२०२३
३) छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार-२०२४
*राज्यस्तरीय पुरस्कार* :-
१) कोकणभूषण पुरस्कार-२०२३
२) समाजरत्न पुरस्कार-२०२३
३) छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार-२०२४
पत्रकार समाजसेवक कैलासराजे घरत यांचे संपूर्ण कुटुंबीय पत्नी सौ.मयुरी कैलास घरत, मुलगी कु.ओवी कैलास घरत, बहीण सौ.कविता गावंड, भावजी श्री.सचीन गावंड भाची कु. वैष्णवी गावंड त्यांच्यासोबत पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. ते समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. दैनिक रायगड स्वाभिमान वृत्तपत्राचे पत्रकार, श्री समर्थ क्लासेसचे संचालक ,डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटणीस, राजा शिवछत्रपती मुंबई परिवार गडसंवर्धन संस्था सदस्य, एमआयटी- राष्ट्रीय सरपंच संसद सदस्य, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत, अशा अनेक संस्थांमध्ये सक्रिय कार्यरत आहेत. समुपदेशक, मार्गदर्शक, शिवव्याख्याते, शिवशंभूचरित्र इतिहास अभ्यासक असून शिवकार्य हेच त्यांचे जीवन कार्य आहे, मनुष्यसेवा हीच ईश्वर सेवा मानून तळागाळातील गोर गरीब गरजू व्यक्तीना मदत करणे, आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे, निस्वार्थी वृत्तीने प्रयत्न करीत आहेत. आदिवासी वाडीवस्त्यांवर बालविवाह प्रतिबंधक जनजागृती करत आहेत. तसेच आदिवासी बंधू भगिनीना मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत
कैलासराजे घरत हे एक अभ्यासू, जिज्ञासू, प्रेमळ, प्रामाणिक, हुशार व्यक्तिमत्त्व आहेत. सामाजिक बांधिलकी जपत संघटनेच्या माध्यमातून गेली 15 ते 20 वर्षे विविध सामाजिक,धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य उपक्रम राबवित आहेत. व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा, संभाषण कला, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, समुपदेशन, शिशुरक्षा, व्यसनमुक्ती, मधुमेह मुक्ती, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड आणि संवर्धन, गडसंवर्धन विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत आहेत त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेत आज रविवार दिनांक १६/०६/२०२४ रोजी त्यांना मुंबई दादर येथे "महाराष्ट्र भूषण पुरस्कार" सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! गोरगरिबांची जाणीव असलेला आणि रात्री अपरात्री मदतीसाठी धावून येणारा, सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेला एक सच्चा कार्यकर्ता म्हणून कैलासराजे घरत हे खारपाडा पंचक्रोशीत, पेण तालुक्यात प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य हीच त्यांची ओळख बनली आहे. मनुष्य ही जात आणि मानवता हाच माझा धर्म अशी त्यांची थोर विचारधारा आहे.
त्यांनी मनात ठरविले की ती गोष्ट ते पूर्ण करतात. सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून देश मला काय देतो, यापेक्षा आपण भारत मातेचे ऋणी आहोत, देशाचे समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून देशासाठी, समाजासाठी नक्की काहीतरी करु शकतो हाच सुविचार घेतला तर नक्कीच अमुलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्याकडून यापुढे ही अशीच निरंतर समाजसेवा घडतंच राहो ह्याच सदिच्छा. पुरस्कारामुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
COMMENTS