प्रतिनिधी :प्रा. सतिश शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा, उत्साहमय प्रसन्न वातावरणात उन्हाळी सु...
प्रतिनिधी :प्रा. सतिश शिंदे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा,
उत्साहमय प्रसन्न वातावरणात उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांनी शाळेत पहिले पाऊल टाकले.
सकळी सर्व प्रथम ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रथमतः इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थितांच्या हस्ते गुलाबपुष्प,पाठ्यपुस्तके,वही पेन पेन्सिल इ शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
नंतर उर्वरित इ २री ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, गुलाबपुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम लोलापोड सरांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमशेत गावचे सरपंच रविंद्र मधुकर डोके होते तसेच
कुमशेत ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार राजेश नागुजी डोके,कृषक सोसायटी शिरोली सदस्य शिवाजी हरिभाऊ डोके, पि.डी.सी बँक निवृत्त अधिकारी सुभाष पंढरीनाथ डोके साहेब, माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल दत्तात्रय डोके, प्रसिद्ध बागायतदार चेतन ज्ञानेश्वर भगत, माजी अंगणवाडी ताई सुलोचना डोके, अंगणवाडी ताई संजीवनी नाईकवाडी, ,माता पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच रविंद्र डोके यानी विद्यार्थ्यांना लाडू व बिस्किटे खाऊ दिला .
उर्वरित उपस्थित मान्यवरांनी शैक्षणिक साहित्याकामी पाच हजार रुपयाची मदत केली.
नविन शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक यशवंत घोडे सरांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS