प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) बुधवार दिनांक २०/०६/२०२४ रोजी सार्थक वेल्फेअर फाउंडेशन पुणे* यांच्या विद्यमानाने आणि जुन्नर तालुका प...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
बुधवार दिनांक २०/०६/२०२४ रोजी सार्थक वेल्फेअर फाउंडेशन पुणे* यांच्या विद्यमानाने आणि जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समिती यांच्या सौजन्याने जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील 550 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक आपटाळे या शाळेत कार्यक्रम घेऊन दप्तरे, वह्या व लेखन साहित्य तसेच बिनाई सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना गोड खाऊ आणि बंटी फूड प्रॉडक्ट्स चे श्री विमलेश गांधी यांच्यातर्फे चिक्की वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील साहेब शिक्षणाधिकारी, श्री संजय नाईकडे साहेब यांनी शिक्षकांना लोकसहभागाचे आव्हान केले होते, त्यातून शैक्षणिक साहित्य मिळविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला. आदिवासी भागातील विद्यार्थी लेखन साहित्य पासून वंचित राहू नये. शिक्षणात खंड पडू नये म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न असतो.
खालील शाळांना दप्तरे वाटप करण्यात आली घंगाळदरे, धालेवाडी,कालदरे, विरणकवाडी,केळी,रांनचरी, सोमतवाडी/ठाकरवाडी, खैरे,कातकरीवस्ती, पाचघर, जळवंडी, आपटाळे, बोतार्डे, वाजेवाडी, बगाडवाडी, हातविज, देवळे, आंबेदरा, तळेचीवाडी, कवटेवाडी, वानेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना श्री नितीन शेलार सर, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला आघाडीच्या प्रवक्त्या सौ. ज्योती शेलार मॅडम या सेवाभावी दांपत्याच्या माध्यमातून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दप्तरे वाटप करण्यात आले. सार्थक वेल्फेअर सोशल फाउंडेशनचे कार्य शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत आहे अजूनही आदिवासी भागातील शाळेंना दप्तरे व साहित्य वाटप करण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी कात्रज दूध संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब देवाडे तसेच सार्थक वेलफेअर फाऊंडेशनचे श्री, संग्राम मदने, सौ. अर्चना जोशी मॅडम, सौ.संगिता सबनीस मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष आणि जुन्नर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक बाळासाहेब लांघी ,जुन्नर तालुका शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष विठ्ठल जोशी,तुषार डुंबरे नामदेव मुंढे विलास किरवे ,सागर भवारी यांनी केले. यावेळी शिक्षक जयसिंग मोजाड, बाळासाहेब गवारी लक्ष्मण दाभाडे, जयश्री भालचिम ,बाळासाहेब करवंदे,विलास किरवे, सुचिता मरभळ, भरत घोटकर, मीरा लोहकरे मॅडम रेखा मोहिते मॅडम, मॅडम इत्यादी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समिती कार्याध्यक्ष विठ्ठल जोशी यांनी केले, व आभार महिला शिलेदार शोभा उंडे यांनी मानले....
COMMENTS