प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथे नुकतेच ट्रेनिंग व प्लेसमेंट वि...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथे नुकतेच ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने "कॅम्पस ड्राईव्ह २०२४" अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कॅम्पस ड्राईव्ह मध्ये समर्थ शैक्षणिक संकुलातील तेरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
ब्रेंबो ब्रेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमार्फत समर्थ शैक्षणिक संकुलातील पॉलिटेक्निक,बीसीएस व बीकॉम च्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
ब्रेम्बो ब्रेक्स प्रायव्हेट इंडिया लिमिटेड या कंपनीच्या प्लांट एच आर सुवर्णा शेलार व डेप्युटी मॅनेजर सुधीर हर्गुडे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची निवड प्रक्रिया पूर्ण केली.मुलाखती द्वारे निवड करताना विद्यार्थ्याला असलेले विषयाबाबतचे सखोल ज्ञान,संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,कल चाचणी या बाबींचा विचार करून निवड केल्याची माहिती डेप्युटी मॅनेजर सुधीर हरगुडे यांनी दिली.
या मुलाखती मध्ये मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातून सुयोग लामखडे,ओमकार जाधव,शुभम कदम,अक्षय चोरे,रुपेश दिघे,आदित्य आहेर तर बी.बी.ए.विभागातून मधून तन्मय शिरोळे,अपेक्षा रोहकले,किर्ती गांगड या विद्यार्थ्यांची तसेच समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स (बीसीएस) मधून कीर्ती खांडकर,गौरी दाते,वैशाली वराळ यांची तर कॉमर्स मधून किशोर आहेर यांची निवड करण्यात आली.
सदर मुलाखतीचे नियोजन आय टी आय विभागाचे विष्णू मापारी,समर्थ पॉलिटेक्निक चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा.संकेत विघे,महेंद्र खटाटे,हुसेन मोमीन आदींनी केले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS