बेल्हे : जुन्नर तालुक्यातील मौजे बेल्हे ता.जुन्नर जि.पुणे येथे १ जून २०२४ रोजी संत कबीर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमि...
बेल्हे : जुन्नर तालुक्यातील मौजे बेल्हे ता.जुन्नर जि.पुणे येथे १ जून २०२४ रोजी संत कबीर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी ( भारत ) रजि आणि आम्ही भारतीय सोशल फाऊंडेशन बेल्हे ता.जुन्नर जि.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बेल्हे ता.जुन्नर जि.पुणे रामटेक व्यापारी संकुल येथे राज्यस्तरीय ग्रामीण कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कवी संमेलनात महाराष्ट्रातील जवळपास ४० कवींनी सहभाग नोंदवला आहे, तरी या कवी संमेलनाचा रसिक श्रोत्यांनी आंनद घ्यवा अशी आयोजकांच्या वतीने विनंती.
या कार्यक्रमाची रूपरेषा-
सकाळी १० वाजता आलेल्या पाहुण्यांचे स्वागत तदनंतर महापुरूषांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व दिप प्रज्वलन करण्यात येईल त्यानंतर ११ वाजता मुख्य कवी संमेलनाला सुरूवात होईल, दुपारी २ वाजता स्नेहभोजन सर्वांसाठी देण्यात येणार आहे, दुपारी ३ वाजता कवी संमेलनाच्या दुसर्या सत्राला सुरूवात होईल, सायंकाळी ४ वाजता आलेल्या कवी व मान्यवरांचा यथोचित सत्कार व सन्मान केला जाणार असून त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे अध्यक्षीय भाषण व कार्यक्रमाची सांगता होईल.
या कवी संमेलनात सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी संयोजक व आयोजकांची नम्र विनंती.
COMMENTS