प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) रवीवार दिनांक १९ मे २०२४ रोजी ओतूर,ता. जुन्नर येथील कवठे यमाई मंदिरात डिसेंट फाउंडेशन पुणे व आर झुनझुनव...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
रवीवार दिनांक १९ मे २०२४ रोजी ओतूर,ता. जुन्नर येथील कवठे यमाई मंदिरात डिसेंट फाउंडेशन पुणे व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. त्यास ओतूर आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी ९६ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व २९ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.
शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, प्रवास, निवास, नाश्ता व जेवण हे सर्व मोफत दिले जाते. तसेच एका महिन्याची औषधे देखील दिली जातात. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ.फकीर आतार,शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डी.एम.मोरे,महादेव ओतूरकर,सुनंदा डुंबरे,विठ्ठल शितोळे,श्रीराम डुंबरे,दिलीप घोलप,सागर गाढवे,प्रमोद बोडके, अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जय बजरंग गणेश मंडळ,सारथ्य फाउंडेशन,ओतूर येथील महिला व पुरुष जेष्ठ नागरिक संघ यांनी प्रयत्न केले.
COMMENTS