प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलीटेक्निक बिल्ले या महाविद्यालयात नुकतेच "कॅम्...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलीटेक्निक बिल्ले या महाविद्यालयात नुकतेच "कॅम्पस ड्राईव्ह २०२४" चे आयोजन करण्यात आले होते.मदरसन ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी अँड इंजिनियरिंग या बहुराष्ट्रीय कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.या कॅम्पस ड्राईव्ह साठी समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे मधून ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांना विषयाबाबतचे असलेले सखोल ज्ञान,संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,कलचाचणी या बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती एच आर मॅनेजर प्रतीक लोखंडे यांनी दिली.मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून आदेश सरोदे,भूषण शिंदे,प्रथमेश बुट्टे,ओंकार पवार,दिपक चव्हाण,रामेश्वर कांदळकर तसेच इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून गणेश खोसे,तेजस खुटाळ,दिपक लोखंडे,पोपट निचित,यशराज पटवा,ऋषिकेश शिरोळे व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून वैभव आहेर,प्रतीक भोर,अभिषेक खुटाळ व अथर्व भुजबळ या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
सदर निवड प्रक्रिया एच आर मॅनेजर प्रतीक लोखंडे यांनी पूर्ण केली.सदर प्लेसमेंट ड्राईव्ह पूर्ण करण्यासाठी प्रा.संजय कंधारे,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.संकेत विघे,मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागप्रमुख प्रा.आशिष झाडोकर,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते,प्रा.हुसेन मोमीन,प्रा.माधवी भोर,प्रा.सोनम थोरात आदींनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS