देश गौरवासाठी झिजला, महाराष्ट्र माझा! १मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस.महाराष्ट हे देशातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,व सांस्कृतिक वार...
देश गौरवासाठी झिजला, महाराष्ट्र माझा!
१मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस.महाराष्ट हे देशातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,व सांस्कृतिक वारसा लाभलेले अग्रेसर राज्य राहिले आहे.पुरोगामी वैचारिक अभ्युदयाची कसदार पेरणी करणार्या अनेक संत महंत, महापुरुषांची जन्मभूमी व कर्मभुमी असलेले असे हे गौरवशाली परंपरा असलेले राज्य आहे
आज महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून शिवाजी महाराजांनी १९फेब्रुवारी१६३० रोजी शिवनैरी किल्ल्यावर स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी चा शिवपुर्वकालीन महाराष्ट्र जाणून घेऊ यात.आदिलशाही व निजामशाही अर्थातच महाराष्ट्र व लगतच्या भूप्रदेशात मुघलांची सत्ता होती संपुर्ण भूभाग हा मुघलशाही अधिपत्याखाली असल्याने लोक अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते धर्म व कर्मकांड नावे सामान्य जनतेचा अमानुष छळ होत होता,ब्र उच्चारला तरी अनन्वित अत्याचार केले जात
शिवपूर्व काळात ही गावं कसबा,परगाणा अशी विभागणी होती पाटीलकी, सरदारकी मिळावी म्हणून हुजरेगिरी करणारी आपलीच माणसं अन्याय करत असत.प्रजा आणि राज्यकर्ते यामधील दुवा म्हणून प्रशासकीय अधिकारी तैनात असत हि सर्व यंत्रणा राज्य कर्त््याच्या मर्जीतील असायची म्हणूनच राजा बोले दल हले ही म्हण रूढ झाली.स्वराज्यात महाराजांनी आठ खात्यात कारभाराची विभागणी करून अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते रयत केंद्र स्थानी ठेवून त्यांनी राज्यांची घडी बसवली स्वातंत्र्य समता बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार करणारे महाराज हे पहिले राजे होते.शेतकरी, कष्टकरी, स्त्री सन्मान व सर्वधर्म समभाव व जातपात विरहीत आदर्श समाजाची रचना व आदर्श राजकारभार ही प्रेरणा आपल्या घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करून जगाला वंदनीय व आदर्शवत असे संविधान देशाला दिले
*जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा*
हे गीत शिंदे सरकारने राज्य गीत म्हणून घोषित केले, सदरहू गीतात कवी राजा बढे यांनी देशगौरवासाठी महाराष्ट्राची भूमिका, योगदान यांचे यथार्थ वर्णन केले आहे
महाराष्ट्र राज्यातील जनता कायम देशासाठी लढली, मुघल सम्राट,अफगानी, इराणी, तसेच विदेशातील डच , पोर्तुगीज, इंग्रज यांच्या विरोधात प्रथम महाराष्ट्र भिडला,त्यांना नामोहरण करण्याची ताकद ही ह्या मातीने पोसलेल्या मनगटात होती हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे साहित्यिक,शाहिर यांच्या लेखणीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दखलपात्र आहे काव्यातील बंड, पोवाड्यातील कणखर बाणा स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचं शस्त्र ठरले
महिलांना अधिकार देणार्या हिंदू कोड बिलावरून केंद्र सरकारच्या रोधात राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर व राज्यावरचा अन्याय सहन न झाल्याने केंद्रीय अर्थमंत्री पदाचा त्याग करणारे सि डी देखील महाराष्ट्राचेच स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या सह्याद्री हा यथोचित गौरव झाला तो याच अनुषंगाने
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोक मराठी भाषा बोलणारे आहेत मात्र आजही मराठी भाषा दुर्लक्षित आहे १८
हजारांवर मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून सरकारने आमच्या मुलांची मराठी भाषाच हिरावून घेतली ९७ साहित्य संमेलने. झालीत त्या सर्व संमेलनात अभिजात दर्जा हा मुद्दा अजेंड्यावर अग्रभागी राहिला एवढे नव्हे तर भाषा मंडळाला पात्र व शैक्षणिक निकष पूर्ण करणारा लायक अध्यक्ष सरकार देऊ शकलेले नाही, भलेही मराठी मंत्रालयात मराठी राज्य भाषा म्हणून प्रस्थापित झाली असली तरी सर्व सामान्य माणसाला काही फायदा झालेला नाही.आजही सर्व शासकीय आदेश,न्यायालयीन निकाल हे इंग्रजी भाषेत असतात
लोकसंख्येने सर्वाधिक मराठी बोलणार्या राज्यात मराठीत पाट्या लावा ह्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते हे निर्विवाद सत्य आहे, मुंबईत अशा मुजोरांवर दुप्पट करवसुली चे, बोटचेपे धोरण जाहीर केले आहे यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?
माणसातील जीवनातले व दैनंदिन व्यवहारात भाषेचे महत्व अनन्य साधारण आहे त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचा आग्रही वापर कटाक्षाने करायलाच हवा
देशातील सर्व योजना व उपक्रम हे हिंदी भाषेत असतात हिंदी राष्ट्रभाषा आहे हे मान्य आहे तरीही राज्य शासनाने अशा घोषणा, बोधवाक्य, योजना मराठीत अनुवादित करून प्रसिद्ध करायला हवेत
पेट्रोल पंप, सार्वजनिक ठिकाणी प्रचारार्थ निवेदन मराठीत असावेत म रा परिवहन महामंडळाच्या बस वर*मेरी माटी मेरा देश* हे *माझी माती माझा देश* असा बदल करून लिहिले असते तर !
अशा साध्या गोष्टीही भाषा संवर्धन व प्रसाराप्रती सरकार किती पॅसिव्ह आहे हे लक्षात येते
मराठी भाषेसाठी मंत्री मंडळ खूप काम करते म्हणून साहित्य संमेलन मंचावर बसण्याचा आमचाही अधिकार आहे हे अमळनेर येथील मंत्री महोदय यांचे विधान खुपते ते या अर्थी
मंत्री महोदय यांचा अधिकार आहेच पण मराठी भाषा संवर्धन व प्रसाराप्रती ठोस पावले उचलली पाहिजेत असे वाटते. महाराष्ट्र राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनी मराठीमय शुभेच्छा!!!
विद्रोही कवी, साहेबराव मोरे सर
संस्थापक अध्यक्ष
खानदेश साहित्य परिषद
९४०४०४८६०१
COMMENTS