गुंजाळवाडी गावचे ग्रामदैवत आई मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मुक्तादेवी चषक 2024 भव्य निमंत्रित मुले व मुलींचे खो-खोचे सामने जिल्हा...
गुंजाळवाडी गावचे ग्रामदैवत आई मुक्तादेवी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मुक्तादेवी चषक 2024 भव्य निमंत्रित मुले व मुलींचे खो-खोचे सामने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी च्या मैदानावर भरविण्यात आले होते.या मुक्तादेवी चषकाचे यावर्षीचे विजेते मुली मुक्तादेवी क्रीडा प्रबोधिनी गुंजाळवाडी व मुले भोसे तालुका खेड ठरले. विजयी संघांना प्रत्येकी रोख रक्कम 11 हजार रुपये व भव्य चषक देण्यात आला. या स्पर्धेसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून नामांकित संघांना निमंत्रण देण्यात आले होते .बारामती, इंदापूर ,खेड, आंबेगाव, हवेली, दौंड, जुन्नर या संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता. गुंजाळवाडी येथील मुक्तादेवी क्रीडा प्रबोधिनी व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सुमारे एक लक्ष रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
COMMENTS