प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) आज बुधवार दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी डिंगोरे, ता. जुन्नर येथील श्रीराम जेष्ठ नागरिक संघातील आजी-आजोबांन...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
आज बुधवार दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी डिंगोरे, ता. जुन्नर येथील श्रीराम जेष्ठ नागरिक संघातील आजी-आजोबांना डिसेंट फाऊंडेशनच्या वतीने व निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शाम बनकर यांच्या सौजन्याने आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उतारवयात ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याविषयी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देखील देण्यात आली.
याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, निवृत्ती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्याम बनकर , जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती अध्यक्षप्रा. एकनाथ डोंगरे , उपाध्यक्ष नानाभाऊ रासकर , सचिव नामदेव दिघे , सहसचिव मच्छिंद्र सरजिने , श्रीराम जेष्ठ नागरिक संघ डिंगोरे अध्यक्ष लक्ष्मण लोहोटे ,उपाध्यक्ष मुरलीधर रोकडे ,सरपंच सौ.सीमाताई सोनवणे , पांडुरंग मोडवे शिवनेरी जेष्ठ नागरिक संघ बाराव,अध्यक्ष, अँड विठ्ठल मुळे, विठ्ठलराव वायकर,दत्ता शिंगोटे , एकनाथ महाराज शिंगोटे, देवराम नाबगे, हनुमंत वैष्णव ,भिवा माळवे ,बाळासाहेब चकवे,माजी सरपंच संभाजी लोहोटे आदी मान्यवर व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर भिसे यांनी केले, प्रस्ताविक डिसेंट फाऊंडेशनचे सचिव फकीर आतार यांनी केले तर आभार बाळासाहेब खरात यांनी मानले
COMMENTS