जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बेघर व धुणीभाडी कामगार व मजूर कामगार यांना त्यांच्या हक्कासाठी प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग स...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील बेघर व धुणीभाडी कामगार व मजूर कामगार यांना त्यांच्या हक्कासाठी प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र चे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण व अरुण शेरकर अध्यक्ष याच्या मार्गदर्शनात आज संस्थेच्या कार्यालयात मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राहुल मुसळे उपाध्यक्ष, सुनिल जंगम, शेख अहमद इनामदार, महिला संघटनाच्या नफिसा इनामदार अध्यक्षा, रजनी शहा उपाध्यक्षा, शम्मीम सय्यद सचिव, गायत्री गिरी सहसचिव, सिताबाई मुंढे, उषाताई तेलोरे, ललिता शिराळशेठ, छबूबाई लोढे, अंजू कुटे, हसिना मुलाणी, पदाधिकारी व महिला सदस्या उपस्थित होते या वेळी मिटिंग मध्ये महत्वाच्या विषया वर चर्चा करण्यात आली
वय १८ च्या पुढील सर्व धुणीभांडी कामगार व मजूर कामगार यांना शासनाकडे ऑनलाइन रजिस्टर करून नाव नोंदणी करणे वय ५५ च्या पुढील कामगाराना शासनाच्या विविध योजना चा लाभ मिळून देण्यात येणार आहे
संस्थेकडे नोंदणी झालेल्या सर्व धुणीभांडी कामगार ऑनलाइन रजिस्टर झालेल्या कामगाराना प्रत्येकांचे संस्थेच्या वतीने दोन लाख रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे व १० लाख रूपयांचा ४०० रूपयात वैयक्तिक विमा काढण्यात येणार आहे
धुणीभांडी कामगार व मजूर कामगार याच्या मुलाचे ८ वी पास पुढील वय १८ वर्ष ते ३५ वयोगटातील मुलाना मोफत १० प्रकारचे प्रक्षिशण ३ महीने रहाण +जेवण+शैक्षणिक साहित्य मोफत प्रक्षिशणा नंतर लगेच १००%खाजगी नामांकित कंपनी त जाॅब (नोकरी )
महिला करीता घरबसल्या काम यांचे मोफत प्रक्षिशण व साहित्य खरेदी करीता आर्थिक सहाय्य आधार कार्ड, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, आधारला मोबाइल नंबर लिंक, कामगार नाव नोदंणी कॅम्प चे आयोजन
संस्थेकडे नोंदणी झालेल्या कामगाराना बेघर लोकांना जागा व घरकुल करीता लवकरच जागा खरेदीकरीता भांडवल व जागा खरेदि करून घरकुल योजना देण्यात येणार आहे
व इतर अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
या वेळी अरुण शेरकर अध्यक्ष व रजनी शहा यानी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले.
COMMENTS