प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन स...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन सन २०२२-२३ चे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड मानांकन विज्ञान प्रदर्शन दिनांक १२ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान नेताजी सुभाषचंद्र सैनिकी स्कूल फुलगाव ता. हवेली येथे आयोजित केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डाॅ.भाऊसाहेब कारेकर यांनी दिली.
सदर जिल्हास्तरीय इन्स्पायर मानांकन विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील १९४ प्रकल्प सहभागी होणार आहेत. सन २०२३ व २३ मध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभागी होणे बंधनकारक आहे. प्रदर्शनामध्ये सहभागी होत असताना अवॉर्ड प्राप्त विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र व आयडिया राईट अप विहित नमुन्यात घेऊन येणे बंधनकारक असून जिल्हास्तरांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्याची संधी असल्याने तीनही दिवस विद्यार्थी उपस्थित राहतील. सर्व विद्यार्थ्यांची व मार्गदर्शक शिक्षकांची तीनही दिवस निवास व भोजन व्यवस्था केली असल्याची माहिती जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाड यांनी दिली.
सदर जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शना मध्ये राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञ डाॅ. जे. के. सोळंकी यांचे बालवैज्ञानिक यांना मार्गदर्शन होणार आहे. तसेच पेंटेंन्ट कसे नोंदवावे यावर युवा शास्ञज्ञ अंकिता नगरकर यांचे मार्गदर्शन असणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गणित व विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य नियोजनामध्ये सहभागी असणार असल्याचे जिल्हा विज्ञान संघाचे सचिव रावसाहेब चौधरी यांनी सांगितले.
COMMENTS