प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) आज शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी चिंचोली, ता. जुन्नर, जि. पुणे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डिस...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
आज शनिवार दिनांक २० एप्रिल २०२४ रोजी चिंचोली, ता. जुन्नर, जि. पुणे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून व भवताल प्रतिष्ठान व ग्रामपंचायत चिंचोली यांच्या सहकार्याने मोफत ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वीस महिलांची ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात आली.
जुन्नर तालुका हा कॅन्सर मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशन ने केलेला असून त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच गावोगावी जाऊन या शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे यावेळी संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.
यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव फकीर आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, सरपंच खंडू काशीद, माजी सरपंच उत्तम काशीद, तपासणी तज्ञ मंगल गाडगे, ग्रामपंचायत सदस्य छायाताई काशीद, मंदार काशीद, ग्रामसेवक अर्चना केदारी, आदी मान्यवर ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS