कल्याण : महात्मा ज्योतिबा फुले हे नाव आपल्या देशात पूजनीय आहे कारण भारतीय समाजाच्या उन्नती आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रात त्यांचे महत्त्वपू...
कल्याण : महात्मा ज्योतिबा फुले हे नाव आपल्या देशात पूजनीय आहे कारण भारतीय समाजाच्या उन्नती आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी शिक्षण, समाजसुधारणा, महिलांचे शिक्षण या क्षेत्रात काम केले आणि कष्टकरी वर्गातील लोकांना चांगले जीवन जगण्याचा संदेश दिला. ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला होता. त्यांचे योगदान आणि त्यांच्या आदर्शांचा प्रभाव आजही आपल्या समाजात महत्त्वाचा आहे.
त्यांच्या जयंतीदिनी चिंचपाडा कल्याण पूर्व येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली, यावेळी प्रशांत सर व बागूल सर यांनी जयंतीदिनी आपले विचार मांडले सर्वच जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन चालले पाहिजे सर्वधर्मसमभाव असला पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यक्रम सर्व लोकांसाठी असतो. सर्वानी कार्यक्रमाला यायला पाहिजे, आपल्याला महापुरूषांच्या विचारांनी जगण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले, यावेळी श्री प्रशांत माळी साहेब, श्री.युवराज लोंढे साहेब, कु.ऍड अंकित पिंगळे साहेब, कु.विक्रम बटवाल,श्री.दुर्गेश बागूल साहेब, श्री.पोपटराव शिंदे साहेब, श्री.निवृत्ती अहिरे साहेब, श्री.दत्तात्रय निकम साहेब, श्री.शरद काळे साहेब, श्री.कैलास वानखंडे साहेब, श्री.पी एम रॉय साहेब,श्री.संपत कारंडे साहेब, पूनम बागूल मॅडम, गीता बेळे मॅडम, सुरेखा बटवाल मॅडम, पूजा वानखंडे मॅडम, नंदा वाडेकर विविध क्षेत्रातील नामवंत व परिसरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.
COMMENTS