प्रतिनिधी - शरद शिंदे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे शाळा पूर्व तयारी मेळावा व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयो...
प्रतिनिधी - शरद शिंदे.
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे शाळा पूर्व तयारी मेळावा व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.दाखलपात्र विद्यार्थ्यांचे फेटे बांधून व मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.त्यानंतर इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व लाडू तसेच फुगे देऊन सत्कार करण्यात आला.इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती आपली आत्मीयता व्यक्त केली. शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व पाठ्यपुस्तकातील कवी मा. श्री उत्तम सदाकाळ लाभले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांच्या शालेय जीवनातील अनेक लहानमोठ्या आठवणींना उजाळा दिला.आपल्या व्याख्यानातून त्यांनी आईची महती पटवून दिली तसेच इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमातील फरक पटवून सांगितला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आपटाळे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. सुरेश भवारी साहेब होते. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लोकसभा मतदान जागृती अभियान अंतर्गत सर्वांना मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती व सुराळे गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस मिसळपाव व लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
COMMENTS