प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी कैलास नगर, हिवरे बुद्रुक, ता. जुन्नर येथील हनुमान मंदिराच्या सभागृह...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी कैलास नगर, हिवरे बुद्रुक, ता. जुन्नर येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात डिसेंट फाउंडेशन पुणे व शिवशंभो प्रतिष्ठान कैलास नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्री हॉस्पिटल आळेफाटा , आरोग्य विभाग पंचायत समिती जुन्नर व हिंद लॅब जुन्नर यांच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण १८५ नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तीस महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली, ८० रुग्णांची हृदयरोग व मूत्ररोग तपासणी करण्यात आली तर ७५ जणांची शुगर बीपी व रक्तातील तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कैलासनगर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला. तसेच या गावची कन्या रमा विठ्ठल बनकर हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून तिची तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, पंचायत समितीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ. अक्षय जाधवर, डिसेंट फाऊंडेशनचे सचिव डॉ. फकीर आतार, डॉ. शुभम कारंजकर, डॉ. विकास डुबे, शिबिर समन्वयक विशाल घोडे, तपासणी तज्ञ पल्लवी थेटे, प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे, समुपदेशक संदेश थोरात, प्रयोगशाळा तज्ञ दत्ता रोकडे, शिवशंभो प्रतिष्ठानचे सदस्य नितीन भोर, विनय हांडे, प्रदीप बनकर, निलेश भोर, ज्ञानेश हांडे, किरण हांडे,चंद्रकांत हांडे, परिचारिका, अशा सेविका, प्रयोगशाळा तज्ञ, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मुळे यांनी केले.
COMMENTS