प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्यामुळेच 42 वर्ष...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्यामुळेच 42 वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावता आली असल्याचे मत साखर संकुल पुणे येथे सीओ सचिन घाडगे यांनी कृष्णराव मुंढे विद्यालयातील सेवक चंद्रकांत सखाराम ताजणे यांच्या सेवापुर्ती कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
संस्थेच्या पाईट, कनेरसर व जुन्नर अशा विविध शाखांमध्ये त्यांनी सेवा केली असुन संस्थेमध्ये सर्वात जास्त सेवा बजावणारे हे कर्मचारी असून ताजणे परिवाराने संस्थेच्या विकासासाठी कायम हातभार लावला असल्याचे संस्थेचे सचिव देवराम मुंढे म्हणाले.
याप्रसंगी आदिवासी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुरेखाताई मुंढे, सचिव देवराम मुंढे, साखर संकुल पुणेचे सीओ सचिन घाडगे, माजी उपशिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद सिद्धार्थ चव्हाण, डिसेंट फाउंडेशन जुन्नरचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, वारुवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, पाईटच्या सरपंच अश्विनी रौंधळ, बाळासाहेब सदाकाळ, संदीप ताजणे, सूर्यकांत घोलप,अकबर इनामदार, सुभाष डांगले, रमेश दौंडकरआदींसह संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णराव मुंढे विद्यालयातील सर्व स्टाफच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन ताजणे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पाईट ग्रामस्थांच्या वतीने पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघनाथ जाधव यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब कवडे यांनी तर आभार प्रशांत घुले यांनी मानले.
COMMENTS