प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) सोमवार दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आळे, ता. जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन, पुणे, सु...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
सोमवार दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आळे, ता. जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन, पुणे, सुवर्णयुग युवामंच, आळेफाटा यांच्या सहकार्याने व शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, व ३० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. या शिबिरा मार्फत रुग्णांना शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, नाश्ता व एक महिन्याची औषधे इत्यादी सुविधा मोफत देण्यात येणार आहेत.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,मा. पंचायत समिती उपसभापती गंगाराम गुंजाळ,मा.पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके,सचिव शिवाजी कुऱ्हाडे, सहसचिव नामदेव दिघे,माजी सैनिक जालिंदर माळी,नागेश कुऱ्हाडे,हिरोजी कुऱ्हाडे,भाऊ डावखर, गणेश शिंदे, योगेश वाघचौरे, डॉक्टर, टेक्निशियन,आशा सेविका, ग्रामस्थ व नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आळे व वडगाव आनंद येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी सहकार्य केले.
COMMENTS